कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग १)
परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण, माझ्या समजुतीप्रमाणे, त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती आम्हाला वाटते; हे आहे. म्हणून जी आमची कुटुंबे आम्ही प्राणपणाने जपत आहोत त्यांचे खरे स्वरूप कसे आहे ते पाहू. त्यासाठी आपणाला कुटुंबाची शास्त्रशुद्ध व्याख्या करण्याची गरज नाही. पण साधारणपणे असे म्हणता येईल की कुटुंबामध्ये एका घरात राहणारे, …